वायू प्रदुषणामुळे पक्षी स्थलांतरात घट 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

गुडगाव - सुलतानपूर पक्षी अभयारण्य हे पक्षी निरिक्षकांचे आवडते ठिकाण. हिवाळ्यात अनेक परदेशी पक्ष्यांचे येथे स्थलांतर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येथे स्थलांतरीत झाले आहेत. असे असले तरी एकूण स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणामुळे ही संख्या कमी झाली आहे. 

मागील हंगामात जवळजवळ 25 हजार परदेशी पक्षी सुलतानपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरीत झाले होते. परंतु, यावर्षी मात्र पक्ष्यांची संख्या 18 हजारांवर आली आहे. असे असले तरी येत्या दोन महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता पक्षी निरिक्षकांनी नोंदवली आहे. 

पक्षी निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पक्षांच्या प्रजाती या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच अभयारण्यात दाखल होतात. त्यामुळे अनेक वेगवेगऴ्या प्रकारचे पक्षी बघण्याची परवणी पर्यटकांना मिळण्याची शक्यता आहे.

गेले दोन वर्षी उन्याळ्याचे आगमन लवकर होते आहे. तापमानात होणाऱ्या वाढीचा पक्ष्यांच्या स्थलांतरावर नक्कीच परिणाम होत आहे. मागील वर्षी देखील अशी परिस्थीती असली तरी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक पक्षांचे स्थलांतर झाले होते. यावर्षी देखील अशीच शक्यता असल्याचे पक्षीतज्ञ करुणा सिंग यांनी म्हटले आहे.  

पक्षी स्थालांतराविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा 
अशी पाखरे येती...

Web Title: Bad air brings down migratory bird count in Sultanpur