Dhirendra Krishna Shastri esakal
देश
'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान
Dhirendra Krishna Shastri’s vow Against Dakshina : "देशातील कलाकार करोडो रुपये घेतात, नेते पगार घेतात, काहीजण तर लाच घेतात. पण जर दक्षिणेच्या पैशातून एखादे रुग्णालय किंवा भंडारा उभारला जात असेल, तर ते समाजासाठी चांगलेच आहे."
Dhirendra Krishna Shastri : देशभरात बाबा बागेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना उद्देशून सांगितलं की, 'ते मोफत कथा सांगण्यास तयार आहेत. यासाठी त्यांना फक्त यजमान म्हणून उभं राहावं लागेल. स्वतःचा तंबू, ध्वनी व्यवस्था ते घेऊन येतील.'