Shraddha Murder Case : 'असं कृत्य एखाद्या हिंदूनं केलं असतं तर आतापर्यंत देशात दंगली उसळल्या असत्या'

परदेशातून लव्ह जिहाद आणि जातीवादाला खतपाणी घालण्यात येत आहे.
Shraddha Walker Murder Case Pandit Dhirendra Shastri
Shraddha Walker Murder Case Pandit Dhirendra Shastriesakal
Summary

परदेशातून लव्ह जिहाद आणि जातीवादाला खतपाणी घालण्यात येत आहे.

Shraddha Walker Murder Case : सध्या देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी वेगवेगळी मतंही मांडली जात आहेत. अनेकजण याला 'लव्ह जिहाद'चा रंग देत आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही श्रद्धा हत्याकांडावर भाष्य केलंय. पंडित धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांनी म्हटलंय की, 'हे कृत्य जर एखाद्या हिंदूनं केलं असतं तर आतापर्यंत देशात दंगली उसळल्या असत्या.' आफताब अमीन पूनावालानं (Aftab Poonawalla) 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची गळा आवळून हत्या केली आणि दक्षिण दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर पोलिसांनी 14 नोव्हेंबरला आफताबला अटक केली.

Shraddha Walker Murder Case Pandit Dhirendra Shastri
'आफताबनं श्रद्धावर बहिणीप्रमाणं प्रेम करायला हवं होतं, इस्लाम गैर-मुस्लिमशी लग्न करण्याची परवानगी देत नाही'

पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'लोकांना स्वतःची जाणीव नाही. हिंदूंमध्ये (Hindu) एकता उरली नाही. देशात हे कृत्य कोणत्याही हिंदूनं केलं असतं तर आतापर्यंत देशात दंगलीची परिस्थिती निर्माण झाली असती. आतापर्यंत सरकारे बदलली असती. मात्र, आमच्यात सर्वात मोठी कमतरता ही आहे की, आपल्याला याची जाणीव नाही.'

Shraddha Walker Murder Case Pandit Dhirendra Shastri
महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

शास्त्री पुढं म्हणाले, इतर धर्माचे लोक सतत स्वत:ला बळकट करत आहेत. मात्र, हिंदू समाज अजूनही झोपलेला आहे. परदेशातून लव्ह जिहाद आणि जातीवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. भारताचा सनातन धर्म मोडीत काढण्यासाठी आता अरब देशांतून फंडिंग केलं जात आहे. त्याच्या मदतीनं भारतात कट रचले जात आहेत. जातीवादाच्या नावाखाली हिंदूंना आपापसात भांडायला लावलं जात आहे, असंही त्यांनी नमूद केलं. ते भिंडमधील दंडरुआ धाममध्ये बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com