धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ ८१ हजारांहून अधिक ट्विट्स; भारतीयांनी बुद्धी गहाण टाकलीए का?: Bageshwar Dham Sarkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham Maharaj

Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ ८१ हजारांहून अधिक ट्विट्स; भारतीयांनी बुद्धी गहाण टाकलीए का?

Bageshwar Dham Sarkar: मध्य प्रदेशातील धीरेंद्र शात्री महाराज या कथीत अध्यात्मिक गुरु सध्या खूपच चर्चेत आहेत. आज दिवसभरात धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ ८१ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले. त्यामुळं महाराज दिवसभर टॉप ट्रेंडिंगमध्ये होते. या ट्विट्समध्ये त्यांच्या अनेक चमत्काराचे दाखले दिले गेले आहेत. कुठल्याही चमत्कारामागे एक कार्यकारण भाव असतो. त्यात वैज्ञानिक बाबींचा आधार असतो, हे अनेकदा आपण शाळेच्या पुस्तकातून शिकलेलो आहोत. त्यामुळं चमत्कारांना समर्थन देताना भारतीयांनी आपली बुद्धी गहाण टाकलीए का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Bageshwar Dham Sarkar is Top Trending on Twitter Over 81 thousand tweets in support of Dhirendra Maharaj)

धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ काय ट्विट्स झालेत?

धीरेंद्र महाराज खरंच दिव्यशक्ती आहे का?

धीरेंद्र महाराज हे आपल्या समोर उपस्थित कोणाच्याही वैयक्तीक बाबींची माहिती सांगतात. एखाद्याच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात काय ठेवलंय हे ही आपण सांगतो असा दावाही ते करतात. पण ही केवळ दिशाभूल असून हा प्रकार टेलिपथी आणि इंट्युशनचा आहे, असं श्याम मानव सांगतात. तसेच दावे करताना आधीच आपल्या यंत्रणेद्वारे संबंधीत व्यक्तीची माहिती गोळा केली जाते, असे दावे करणाऱ्या अनेक बाबांचा आम्ही पर्दाफाश केल्याचंही मानव यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI: "त्याची खेळी पाहून डिप्रेशन निघून जातं"; रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

पत्रकार परिषदेत दिव्यशक्तीच्या दाव्याची प्रक्रिया व्हावी - मानव

दिव्यशक्तीचे दावे अशा महाराजांकडून आपल्याच दरबारात सिद्ध केले जातात, खरतंर तसा भ्रम निर्माण केला जातो. पण वैज्ञानिक कसोट्यांवर या दाव्यांचा पर्दाफाश करण्यासाठी दावा करणाऱ्या महाराजापर्यंत ही माहिती पोहोचू नये याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळं धीरेंद्र महाराजांची दिव्यशक्तीच्या दाव्याची प्रक्रिया त्यांच्या दरबारात नव्हे तर नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर एका तटस्थ पंच समितीसमोर व्हावी, असं आमचं स्पष्ट आवाहन आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi: आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती जे...; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक

मूळ वाद काय आहे?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवा आणि ३० लाख रुपये मिळवा असं थेट आव्हान दिलं होतं. पण हे सिद्ध न करता महाराजांनी महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईच्या भीतीनं नागपूरमधून आपला मुक्काम हालवला होता. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर हा विषय सध्या खूपच चर्चेला आला आहे.