"त्याची खेळी पाहून डिप्रेशन निघून जातं"; रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव : IND vs NZ 2nd ODI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

IND vs NZ 2nd ODI: "त्याची खेळी पाहून डिप्रेशन निघून जातं"; रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

IND vs NZ 2nd ODI : जगात सध्या अव्वल क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघानं धूळ चारली. या विजयात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा मोलाचा वाटा राहिला. त्यानं ५० चेंडूंमध्ये ५१ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत. एकानं तर आपलं अर्ध डिप्रेशन गेलं अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (IND vs NZ 2nd ODI Rohit Sharma fans showered praise on social media)

हेही वाचा: IND vs NZ : मालिका विजयाची सप्तपदी! भारताने नंबर 1 न्यूझीलंडला चारली पराभवाची धूळ

रोहितनं या सामन्यात इतका बहारदार खेळ केला की, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होणं सहाजिकचं आहे. कर्णाधारपदाच्या जबाबदारीला साजेसा खेळ त्यानं केला आहे. ५० चेंडूंमध्ये ५१ धावा घेताना त्यानं 7 वेळा चेंडू सीमापार पाठवला. ओपनिंगला येत त्यानं शुभम गिल (४०) सोबत ७२ धावांची भागिदारी केली.

हेही वाचा: Rohit Sharma : रायपूरमध्ये रोहितचंच वेड! तरूण चाहत्याने दिली जादू की झप्पी

दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये रोहितनं आपल्या नेतृत्वाची खासियत दाखवताना पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजीमध्ये चांगला बदल केला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानं यजमान न्यूझीलंडच्या संघाला ३४.४ षटकातचं १०८ धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं.

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक; लंकेपाठोपाठ न्यूझीलंडविरूद्धची मालिकाही खिशात

त्यानंतर न्यूझीलंडवर ८ गडी राखत दमदार विजय मिळवला. त्यामुळं भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाच खिशात घातली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला १२ धावांनी हारवलं होतं. या सामन्यात शुभम गिलनं २०० धावा केल्या होत्या.

हेही वाचाः जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

रोहितची या मालिकेतील कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून कामगिरी पाहता त्याचे चाहते देखील जाम खूश झाले असून आजच्या सामन्यातील दमदार अर्धशतकी खेळीमुळं तर या चाहत्यांकडून सोशल मीडियावर रोहितवर कौतुकाचा अक्षरशः वर्षावर झाला आहे.