esakal | 'ती' स्वत:चे केस खायची, डॉक्टरांनी पोटातून काढला केसांचा गोळा
sakal

बोलून बातमी शोधा

Balrampur Hospitak

'ती' स्वत:चे केस खायची, डॉक्टरांनी पोटातून काढला केसांचा गोळा

sakal_logo
By
सुधीर काकडे

लखनऊ: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहानमुलं माती खातात. लहानमुलांच्या या सवयीमुळे त्यांना वेगवेळ्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते. मात्र उत्तरप्रदेशच्या लखनऊमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलीचे काही दिवसांपासुन पोट दुखत होते. वारंवार मुलगी पोट दुखत असल्याची तक्रार करत असल्याने पालकांनी या मुलीला दवाखान्यात नेत तपासणी केली. मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये मुलीच्या पोटात मोठा गोळा असल्याचे लक्षात आले.

बलरामपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या मुलीला मागच्या काही दिवसांपासुन पोटात त्रास होत होता. तिच्या पालकांनी तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. डॉक्टरांनी या मुलीची शस्त्रकिया करण्याचा निर्णय घेतला. आज झालेल्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मुलीच्या पोटातून केसांचा एक मोठा गोळा बाहेर काढला. या गोळ्याचे वजन थोडे-थोडके नाही तर तब्बल १.७५ किलो एवढे होते. मुलीच्या पोटातून बाहेर काढलेला हा पावणेदोन किलोंचा गोळा पाहुन डॉक्टर सुद्धा आवाक झाले.

हेही वाचा: आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

बलरामपूर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी 17 वर्षांच्या मुलीच्या पोटातून सुमारे 1.75 किलो वजनाचा केसाचा गोळा काढला. हे केस नेमके मुलीच्या पोटात कसे गेले असतील असा प्रश्न सर्वांना पडला. या मुलीला केस खाण्याची सवय होती. त्याबद्दल बोलताना बलरामपुर रुग्णालयाचे संचालक रवींद्र कुमार यांनी सांगितले की, नैराश्यग्रस्त लोकांमध्ये हे लक्षणं दिसुन येतात.

loading image
go to top