वीस यूट्यूब चॅनलवर बंदी

केंद्र सरकारची कारवाई; पाकिस्तानी चॅनलचा समावेश
You Tube Channels Banned
You Tube Channels Bannede sakal

नवी दिल्ली : भारत विरोधी दुष्प्रचार सातत्याने होत असल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने तब्बल २० यूट्यूब चॅनल, २ ट्विटर व २ इस्टाग्राम अकाउंट व अन्य २ संकेतस्थळांवर आज बंदी घातली. यात पाकिस्तानमधील ‘यूट्यूब’ वाहिन्यांचा समावेश आहे. मागील वर्षी डिसेंबरनंतर भारताने सोशल मीडियावर केलेली ही मोठी कारवाई आहे.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा व संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले, की या यू ट्यूब चॅनलचे संचलन पाकिस्तानातून होत होते व त्यात उघड भारतविरोधी प्रचार केला जात होता. भारतात यांचे तब्बल १ कोटी २० लाख सबस्कारयबर होते व लाखो लोक त्यावरील विषारी प्रचार पाहात होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या सुरक्षेला यावरील कार्यक्रमांतून धोका असल्यानेच सरकारने पूर्ण चौकशीअंती ही कारवाई केल्याचे माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे नमूद केले. भारतातील विविध संवेदनशील मुद्यांवर या यूट्यूब चॅनल्सद्वारे खोट्या बातम्या व संवेदनशील मुद्यांना हवा देऊन भारताविरुद्धचा अपप्रचार सातत्याने सुरू होता.

बंदी घातलेल्या यूट्यूब वाहिन्या

खबर विथ फॅक्ट, ग्लोबल ट्रूथ,चॅनल खबर तेज, ‘इन्फाॅर्मेशन हब’, ‘फ्लॅश हब’, ‘फैजल तरार स्पीकस्’, ‘अपनी दुनिया’, ‘हकीकत की दुनिया’, ‘शहजाद अब्बास’, ‘मेरा पाकिस्तान विथ साहब’, ‘खबर विथ अहमद’, ‘एच आर टीवी’, ‘सबी काझमी’, ‘सच टीवी नेटवर्क’, ‘साकिब स्पीकस’, ‘सलमान हैदर ऑफिशियल’, ‘साजिद गोंडाल स्पीकस्’, ‘मलिहा हाशमी’, ‘उम्रदराज गोंडल’, ‘खोज टिव्ही’, ‘खोज टिव्ही- २.०’, ‘कव्हर पॉइंट’, ‘जुनैद फिल्क्स’ ‘नेशनल स्टुडिओ’, ‘इन्फॉर्मेटिव्ह वर्ल्ड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com