

One-Year-Old Elephant Calf 'Krishna' Steals the Show at Bandhavgarh Festival
Sakal
मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सध्या हत्ती महोत्सवाची धूम सुरू आहे. २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान धमोखर बफर परिक्षेत्रातील पारसी गेट येथे आयोजित या महोत्सवात यंदा एक वर्षाचा चिमुकला हत्ती ‘कृष्णा’ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पहिल्यांदाच तो सार्वजनिकरित्या पर्यटकांसमोर आला असून त्याच्या खोडकर हालचाली आणि खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.