बंगळूर हिंसाचारामागे ‘एसडीपीआय’ - बोम्मई

वृत्तसंस्था
Friday, 14 August 2020

एसडीपीआयचे अध्यक्ष इलियास मुहम्मद थुंबे म्हणाले की,जमावाला शांत करण्याच्या कामात पाशा मदत करत होते. नेहमीप्रमाणे, पोलिसांची निष्क्रियता लपविण्यासाठी एसडीपीआयला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बंगळूर - शहरात मंगळवारी रात्री झालेल्या दंगलीच्या पोलिस चौकशीत सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा (एसडीपीआय) हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील चार सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपावरून आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे पी. नवीन याच्याविरुद्ध व हिंसाचारत हात असल्याच्या आरोपावरून एसडीपीआयच्या काही कार्यकर्त्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १४० जणांना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, एसडीपीआयने यात आपला हात नसल्याचे म्हटले आहे. एसडीपीआयचे अध्यक्ष इलियास मुहम्मद थुंबे म्हणाले की, ‘‘जमावाला शांत करण्याच्या कामात पाशा मदत करत होते. नेहमीप्रमाणे, पोलिसांची निष्क्रियता लपविण्यासाठी एसडीपीआयला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१४० जण अटकेत
मंगळवारी झालेल्या जाळपोळ, तोडफोड आणि दंगलप्रकरणी डी. जे.हळ्ळी पोलिसांनी भारतीय सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अफलन, मुझमिल पाशा, सय्यद मसूद, अयाज आणि अल्लाबक्ष यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याशिवाय पोलिसांनी मंगळवारी झालेल्या हिंसक जमावात भाग घेतलेल्या २०० जणांवरही गुन्हा दाखल केला असून १४० जणांना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangalore riots reveals involvement of Social Democratic Party of India