अव्वाच्या सव्वा 'फी' घेणाऱ्या शाळेबाबत पालकांमध्ये नेहमीच संताप असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शाळेची फी अव्वाच्या सव्वा झाल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. त्यातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याची फी तब्बल ७.३५ लाख रूपये असल्याचं दिसते आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.