धडक बसल्याच्या संशयामुळे विमान परतले; 180 प्रवासी सुखरूप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

जेट एअरवेजचे मुंबईहून बॅंकॉंकच्या दिशेने निघालेले विमान मागच्या बाजूला धडक बसल्याच्या संशयावरून पुन्हा मुंबईला सुरक्षितरित्या उतविण्यात आले. विमानातील 180 प्रवासी आणि विमान कर्मचारी सुखरूप आहेत.

मुंबई - जेट एअरवेजचे मुंबईहून बॅंकॉंकच्या दिशेने निघालेले विमान मागच्या बाजूला धडक बसल्याच्या संशयावरून पुन्हा मुंबईला सुरक्षितरित्या उतविण्यात आले. विमानातील 180 प्रवासी आणि विमान कर्मचारी सुखरूप आहेत.

जेट एअरवेजच्या 9W 70 या विमानाने आज (शुक्रवार) बॅंकांकला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाण घेतल्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला धडक बसल्याच्या संशयावरून विमानातील कर्मचाऱ्यांनी विमान परत मुंबईला घेण्याचा निर्णय घेतला आणि सुरक्षितरित्या उतरविले. त्यावेळी विमानामध्ये 180 प्रवासी आणि आठ विमान कर्मचारी होते. जेट एअरवेजने त्याबाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमान परत मुंबईमध्ये उतरविण्यात आल्याचे म्हटले आहे. विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना चार तास उशिराने प्रवास करावा लागला.

Web Title: Bangkok-bound jet flight turns back after suspected tail strike