
कोलकता : बांगलादेशातील काही नागरिक बेपत्ता होण्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप बांगलादेशातील हंगामी सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने केला आहे. बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळादरम्यान अनेक नागरिक बेपत्ता झाले असून त्याला शेख हसीना यांचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका या आयोगाने ठेवला आहे.