माझ्याकडून कायद्याचा भंग नाही : शिवकुमार

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

बंगळूर : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून होणाऱ्या चौकशीत कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपण कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग केला नसल्याचा दावा केला आहे. तपासाअंती सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

बंगळूर : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून होणाऱ्या चौकशीत कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपण कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग केला नसल्याचा दावा केला आहे. तपासाअंती सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाने बुधवारपासून शिवकुमार यांच्या विविध मालमत्तांवर छापे घालण्यास सुरवात केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून कॉंग्रेसचे आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झालेले असताना गुजरातच्या 44 कॉंग्रेस आमदारांना शिवकुमार यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे छापासत्रामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला जात आहे.

शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की मी कायद्याचे उल्लंघन करणारा व्यक्ती नाही. छापासत्र मोहीम संपल्यानंतर सत्य लवकरच बाहेर येईल. प्राप्तिकर विभागाचा संपूर्णपणे पंचनामा झाल्यावर आणि कागदपत्रे मिळाल्यानंतरच यासंदर्भात आपणाशी चर्चा करेल. ते म्हणाले, की मला पक्षाचे नुकसान करायचे नाही आणि करणारपण नाही. संकट काळात देशभरातील माझे सर्व नेते माझ्यासमवेत राहिले, याबद्दल मी आभारी आहे. छाप्यासंदर्भात आपण नंतर सविस्तर बोलू, असेही ते म्हणाले. प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरीप्रकरणी शिवकुमार यांच्याशी संबंधित असलेल्या देशभरातील 66 ठिकाणांची तपासणी आणि चौकशी केली आहे. यादरम्यान 15 कोटी रोकडही, दागिने हस्तगत केले.

Web Title: banglore news d k shivakumar and law