banned cough syrup seized : मोठी कारवाई! मालगाडीतून तब्बल दोन कोटींचे प्रतिबंधित 'कफ सिरप' जप्त

banned cough syrup seized from railway goods train: सरकारी रेल्वे पोलिस दल, सीमाशुल्क विभाग आणि विशेष कार्य दल यांची संयुक्त कारवाई
Police officials display seized banned cough syrup bottles worth ₹2 crore recovered from a railway goods train during a major anti-smuggling operation.

Police officials display seized banned cough syrup bottles worth ₹2 crore recovered from a railway goods train during a major anti-smuggling operation.

esakal

Updated on

Banned Cough Syrup Worth Two Crore Recovered from Goods Train: देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या सेवनामुळे अनेक लहान मुलं दगावल्याने देशभर खळबळ माजलेली आहे. असे असताना आता  त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर एका मालगाडीतून सुमारे २ कोटी किमतीचे बंदी घातलेले खोकल्याच्या सिरप जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या आणि शुक्रवारी पहाटे संपलेल्या शोध मोहिमेनंतर ही जप्ती करण्यात आली आणि हे एक मोठे यश मानले जात आहे. तर त्रिपुरा पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवत, सरकारी रेल्वे पोलिस दल, सीमाशुल्क विभाग आणि विशेष कार्य दल यांनी गुरुवारी संयुक्त कारवाई केली."

याचबरोबर पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, "संयुक्त छाप्यादरम्यान, पथकांनी पश्चिम त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या दोन मालगाड्यांच्या वॅगनमधून बंदी घातलेल्या खोकल्याच्या सिरपच्या १०० मिलीच्या तब्बल ९० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत." याप्रकरणी अद्पापर्यंत तरी कुणावरीही अटकेची कारवाई झालेली नव्हती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Police officials display seized banned cough syrup bottles worth ₹2 crore recovered from a railway goods train during a major anti-smuggling operation.
Chhagan Bhujbal accuses Manoj Jarange : ''मनोज जरांगेंमुळेच ओबसी अन् मराठा समाजात अंतर पडलं'' ; छगन भुजबळांचा जाहीर आरोप!

भारतात मागील काही दिवसांत कफ सिरप घेतल्याने किडनी निकामी होवून किमान २२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून, कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन कफ सिरपना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com