esakal | Delhi Election : भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?
sakal

बोलून बातमी शोधा

Bansuri Swaraj, daughter of Sushma Swaraj contest election against Kejriwal in delhi
  • केजरीवालांविरुद्ध सुषमा स्वराज यांच्या कन्या?
  • विधानसभा निवडणूक; उद्या भाजपची यादी जाहीर होण्याची शक्‍यता

Delhi Election : भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

sakal_logo
By
वृत्तसेवा

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :
नवी दिल्ली : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली भाजपमध्ये आहेत. बासुरी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून लढावे, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे समजते. येत्या शनिवारच्या आसपास (ता.17) भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. मात्र, स्वतः बासुरी स्वराज यांची सक्रिय राजकारणात पडण्याची इच्छा आहे का, याची माहिती समोर आलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या रणधुमाळीत सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांची उणीव भाजप नेतृत्वाला जाणवू लागली आहे. वर्तमान तिन्ही आमदारांची तिकीटे कायम ठेवतानाच उर्वरित 67 जागांसाठी भाजप नेतृत्व दिल्लीत "फ्रेश' चेहऱ्यांच्या शोधात आहे. केजरीवाल यांच्यासमोर दिग्गज भाजप नेत्याला उतरवावे, असा मतप्रवाह होता; पण केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपला दिल्लीत केजरीवाल सरकारच्या समोर उभा राहील असा नेता सापडणे उंबराच्या फुलापेक्षाही दुर्मीळ असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप नेतृत्वाने अगदी वेगळ्या चेहऱ्यांचा शोध सुरू केला, तेव्हा केजरीवाल यांचेच एकेकाळचे सहकारी कपिल मिश्रा, बासुरी स्वराज, माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे खासदारपुत्र प्रवेश साहिबसिंह आदी नेत्यांबाबत विचार केला. मात्र, नवी दिल्लीतील नोकरशहा व उच्च मध्यमवर्गीय मतदार लक्षात घेता बासुरी यांच्या नावाबाबत स्वतः मोदी आशावादी असल्याचे पक्षनेते सांगतात.

पवारांनी केलेले विधान योग्यच; इतिहासकार कोकाटे यांचे मत

स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेत बासुरी यांनी आभार व्यक्त केले होते. त्यांची बोलण्याची शैली, ऑक्‍सफर्डमध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी, हिंदीवरील पकड यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावित झाल्याचे सांगण्यात येते. स्वराज यांच्या वक्तृत्वाप्रमाणेच त्यांच्यातील धडाडीचा गुणही बासुरी यांच्यात मोदी यांना दिसला असावा व त्यातूनच त्यांच्या प्रस्तावित भाजप उमेदवारीची चर्चा सुरू झाली असावी, असा पक्षनेत्यांचा होरा आहे.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची निवड

फाशीवरून राजकारण
निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना फाशीच्या शिक्षेची 22 जानेवारी ही तारीख पुन्हा टळल्याने सर्वसामान्य नागरिकांत नाराजी व संतापाचीही भावना आहे. हे नवे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून भाजपने आधीच याबाबत "आप'वर आरोप सुरू केले आहेत. भाजप प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आरोप केला की, दिल्ली सरकारने या दोषींना दया याचिका दाखल करण्याची नोटीस देण्यास दोन-अडीच वर्षे विलंब केला. त्यामुळेच त्यांच्या फाशीला होणाऱ्या विलंबाला आप सरकारच दोषी आहे. मात्र "आप'ने भाजपचे आरोप फेटाळताना, भाजपनेच माफी मागावी, अशी मागणी केली. दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राची असते व राज्याला यात काहीही अधिकार नाहीत, हेदेखील मंत्री असलेल्या जावडेकर यांना माहिती नाही काय, असा सवाल आपने केला आहे.

loading image