esakal | Video : पवारांनी केलेलं वक्तव्य योग्यच; इतिहासकार कोकाटे यांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawars statement is correct about Shivaji Maharaj Says Shrimant Kokate

शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे योग्य असून, महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊच आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाहीत असे इतिहासाचे श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकात परिषद घेत स्पष्ट केले.

Video : पवारांनी केलेलं वक्तव्य योग्यच; इतिहासकार कोकाटे यांचे मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे योग्य असून, महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊच आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाहीत असे इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकात परिषद घेत स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकाटे म्हणाले, 'महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी'. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास वगळला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला, इतिहासातून महाराजांचा जो अभ्यासक्रम गाळला गेला आहे तो तात्काळ तो अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

साताऱ्याचे उदयनराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे हे दोघेही महाराजांचे खरे वंशज असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यानंतर मोठा वादही झाला. भाजपकडून यावर नंतर स्पष्टीकरण देण्यात आले होते आणि हे पुस्तक मागे घेण्यात आले.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी मला जाणता राजा म्हणा असे कोणालाही म्हटलो नसल्याचे म्हटले होते. यावेळी बोलताना जाणता राजा हा शब्द रामदासांनी पहिल्यांदा वापरला असल्याचे पवारांनी म्हटले होते, तसेच शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास नसून फक्त जिजामाता याच शिवाजी महाराजांच्या गुरु असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याला आज पत्रकार परिषद घेत इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी दुजोरा दिला.