crime
ESakal
राजस्थानमधील बांसवाडा येथे एका तरुणाने आपल्या सासूची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तरुण त्याची पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला होता. ज्यानंतर आरोपीने हे भीषण पाऊल उचलून त्या महिलेची हत्या केली. हत्यार आणि आरोपीच्या बाईकच्या चाव्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या शोधासाठी संभाव्य ठिकाणी छापे टाकले जात आहेत.