Shocking News : जग सोडताना त्याने जिवाभावाचा दोस्तही सोबत नेला ! प्रॉपर्टी डीलरने पाळीव कुत्र्यासह जीवन संपवले, बंद खोलीत आढळले मृतदेह

Uttar Pradesh crime news : त्याने ताकात ‘सल्फास’ मिसळून आधी कुत्र्याला आणि नंतर स्वतः सेवन केल्याचे तपासात समोर आले. घटनेच्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद होता; पोलिसांनी तोडून आत प्रवेश केला.
Property dealer found dead alongside his pet dog inside a locked rented room in Bareilly, highlighting the severe impact of financial stress and mental distress.

Property dealer found dead alongside his pet dog inside a locked rented room in Bareilly, highlighting the severe impact of financial stress and mental distress.

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बरेलीत एका प्रॉपर्टी डीलरने आपल्या पाळीव कुत्र्यासह जीवन संपवले आहे. दोघांचेही मृतदेह भाड्याच्या घरातील बंद खोलीत आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार ३३ वर्षीय निखिल अरोरा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो सध्या एकटाच राहत होता. त्याच्या आई-वडिलांच्या वैद्यकीय उपचारांवर झालेल्या प्रचंड खर्चामुळे त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती; इतकेच नव्हे तर, त्याला स्वतःचे घर विकण्याचीही वेळ आली होती. अलीकडच्या काळात, प्रॉपर्टी डीलरचे काम सुरू ठेवूनच तो एका भाड्याच्या घरात राहत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com