रेल्वे आणि कारची धडक; पाच जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

बडोदा : भरुच जिल्ह्यात मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर मालगाडी आणि कारची धडक झाल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाले, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सांगितले.

बडोदा : भरुच जिल्ह्यात मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर मालगाडी आणि कारची धडक झाल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाले, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सांगितले.

या अपघातात मरण पावलेले सर्व विद्यार्थी हे भरुचमधील मदरशामधील होते. हे सर्व जण काल सायंकाळी दयदारा गावात त्यांची गाडी या मालगाडीला धडकली, असे पश्‍चिम रेल्वेचे बडोदा विभागाचे जनसंपर्क अधिकारी मीनाकुमार यांनी सांगितले. हा अपघात झाला त्या वेळी कारमध्ये 11 विद्यार्थी आणि चालक होता, असे त्यांनी सांगितले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: baroda gujarat news Rail and car accident; Death of five