भाजप बैठकीत जे.पी.नड्डा यांचा विरोधकांवर हल्लाबोल

jp nadda
jp naddasakal

नवी दिल्ली : विरोधक मोदी सरकारच्या विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज केला. राजकारणात वर्तमानकाळाच्या दृष्टीने सदैव अनुरूप राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

jp nadda
नॉनव्हेज पेक्षा व्हेज महागले!; भाजीपाला आता श्रीमंतासाठीच

भाजपच्या कार्यालयीन प्रमुखांची (ऑफिस बेअरर्स) बैठक राष्ट्रीय मुख्यालयात झाली. नड्डा, भाजप संघटनमंत्री बी. एल. संतोष आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर आदी सहभागी झाले. उद्घाटनावेळी बोलताना नड्डा यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांपासून तुटल्यानेच कमकुवत होत चालल्याचे निरीक्षण नोंदवून नड्डा म्हणाले, की कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी जनतेची जी कामे केली त्यांना तोड नाही.

राजकारणातही कायम प्रासंगिक राहिले पाहिजे. त्या त्या काळातील मुद्दे पुढे आणले नाहीत तर मोठे पक्षही कालबाह्य होतात, हे लक्षात ठेवावे. परिवर्तन हा केवळ विचार नसून भाजप त्यानुसार सातत्याने चालणाऱ्या प्रक्रियेत सक्रिय राहतो. भाजप सदस्यांनी केवळ राजकीय आधारावर काम केले नसून राष्ट्रहितासाठी सामाजिक आधारावरही काम केले आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या मोफत धान्य, गरीबांसाठीच्या कल्याण योजना आदींचा प्रचार करावा, असा सल्ला नड्डा यांनी दिला. दरम्यान उपाध्यक्ष रमणसिंह यांनी सांगितले, की राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचा आगामी काळातील कार्यक्रम अधिक स्पष्ट करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com