

Maharashtra Weather Update bay of bengal low pressure
esakal
Maharashtra Rain Forecast : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा पावसाची शक्यता असून, घाट परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.