BBC I-T Survey : बीबीसीच्या सर्व्हेक्षणावर आयकर विभागाकडून महत्त्वाचा खुलासा

सुमारे 60 तास आयकर विभागाच्या पथकांनी सर्वेक्षण केल्यानंतर आयकर विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
BBC IT Survey
BBC IT Survey esakal

BBC I-T Survey : बीबीसीच्या सर्व्हेक्षणावर आयकर विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे. आयकर विभागाने याबाबत शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बीबीसीने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचेही म्हटले आहे. सुमारे 60 तास आयकर विभागाच्या पथकांनी सर्वेक्षण केल्यानंतर आयकर विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

BBC IT Survey
Bhagat Singh Koshyari : कलेत १०० तर, इतिहासात शून्य; राष्ट्रवादीनं कोश्यारींना पुन्हा डिवचलं

अनेक कागदपत्रांची छाननी केली असता बीबीसीच्या कर भरणामध्ये अनियमितता आढळून आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. ट्रान्सफर प्रायसिंगच्या कागदपत्रांमध्ये या त्रुटी आढळून आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

BBC IT Survey
Teacher E-Mail : एकही विद्यार्थी वर्गात येत नाही, दुःखी होत शिक्षकाने ठोकला मेल पण...

आयटी टीमने कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांद्वारे महत्त्वाचे पुरावे शोधून काढले असून, संस्थेने परदेशी संस्थांद्वारे भारतात उत्पन्न म्हणून पाठवल्या जाणाऱ्या काही रेमिटन्सवर कर भरलेला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, हा कर नेमका कोणत्या प्रकरणात चुकवण्यात आला आहे याबाबत आयकर विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com