Teacher E-Mail : एकही विद्यार्थी वर्गात येत नाही, दुःखी होत शिक्षकाने ठोकला मेल पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Classroom

Teacher E-Mail : एकही विद्यार्थी वर्गात येत नाही, दुःखी होत शिक्षकाने ठोकला मेल पण...

Teacher Mail : विद्यार्थांनी भरलेला वर्ग पाहून प्रत्येक शिक्षकाचा उर आनंदाने भरून येत असतो.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मात्र, जर एखाद्या वर्गात विद्यार्थीचं येत नसतील तर, ही गोष्ट एखाद्या शिक्षकासाठी खूप वेदनादायी असते. असाच विद्यार्थ्यांशिवाय रिकामा वर्ग बघून दुःखी झालेल्या शिक्षकाने विद्यार्थांना मेल ठोकला.

प्रोफेसर जोसेफ मुलिन्स असे मेल पाठवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. मुलिन्स ज्यावेळी वर्गात शिकवण्यासाठी गेले त्यावेळी वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर मुलिन्स यांनी या अनुपस्थितीबाबत सर्व विद्यार्थांना ई-मेल करण्याचे निश्चित केले. त्यांनी विद्यार्थांना मेल केला देखील पण, ज्यावेळी विद्यार्थ्यांनी मुलिन्स यांच्या ई-मेलला उत्तर दिले ते पाहून दुःखाचा हा क्षण आनंदात परिवर्तित झाला.

नेमकी घटना काय?

दक्षिण डकोटा येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक मुलिन्स यांनी लिहिले की, आज 8.15 वाजता मी ज्यावेळी वर्गात शिकवण्यासाठी गेलो तेव्हा ४० विद्यार्थ्यांपैकी वर्गात कुणीच उपस्थित नव्हेत. हे पाहून मला अत्यंत दुःख झाले.

रिकाम्या वर्गात बसून मी सर्व विद्यार्थ्यांना ई-मेलदेखील केला. मात्र, मेल केल्यानंतर दोन मिनिटांनी एका विद्यार्थाने उत्तर दिले.

त्यात त्याने लिहिले होते की, प्रोफेसर आम्हाला वाटते की, बहुदा तुम्ही चुकीच्या वर्गात गेला आहात. पण काही हरकत नाही, मी नेहमी ऑनलाइन असतो असे भन्नाट उत्तर दिले आहे.

आतापर्यंत मुलिन्स यांच्या या पोस्टवर 41.3 जणांनी कमेंट केल्या आहेत तर, 21 लाख लोकांनी ते वाचले आहे. या ट्विटला हजारो लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या असून, इतर अनेक शिक्षकांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या अशाच घटना शेअर केल्या आहेत.

टॅग्स :schoolstudentteacheremail