esakal | राज्यपालांनी बोलावलं तर जावं लागतं; सौरव गांगुली यांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

ganguly

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतल्यानं वेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यपालांनी बोलावलं तर जावं लागतं; सौरव गांगुली यांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावारण तापलं आहे. यातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतल्यानं वेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सौरव गांगुली राजकाऱणात उतरणार अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाकडून ही भेट राजकीय कारणासाठी नव्हती असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच सौरव गांगुली यांनी सांगितलं की, जर राज्यपाल तुमची भेट घेऊ इच्छित असतील तर तुम्हाला भेटावं लागतं. 

गेल्या काही महिन्यांपासून सौरव गांगुली हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा होत आहे. प्रत्येकवेळी सौरव गांगुली यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे. सातत्याने होणारी चर्चा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या भेटीमुळे आता दादा राजकारणात येणार की काय असा प्रश्नही चाहत्यांना पडला. 

राज्यपालांच्या भेटीनंतर बोलताना सौरव गांगुली यांनी म्हटलं की, जेव्हा राज्यपालांना तुमची भेट घ्यायची असते तेव्हा तुम्ही भेटायला हवं. ही एक साधी भेट होती असं म्हणत इतर चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा - सौरव 'दादा' राजकारणात एन्ट्री करणार ? बंगालच्या राज्यपालांशी केली एक तास चर्चा
सौरव गांगुली यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत एका व्यासपीठावर ते दिसले. दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अमित शहा आणि सौरव गांगुली हे एकत्र आले होते. 

पश्चिम बंगालमध्ये मे 2021 मध्ये निवडणुकी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढं आणण्याची शक्यताही वर्तवली जात होती. या चर्चेवर तृणमूल काँग्रेसनं यावर तीव्र नाराजी व्यक्त करत असं झालं तर ते दु:खद असेल. गांगुली यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने ते राजकारणात टिकू शकणार नाहीत असं तृणमूल काँग्रेसनं म्हटलं आहे.

loading image