esakal | सौरव 'दादा' राजकारणात एन्ट्री करणार ? बंगालच्या राज्यपालांशी केली एक तास चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

sourav ganguly.jpg

सौरव गांगुली हे बंगालींसाठी एक आयकॉन आहेत. कारण ते बंगालचे एकमेव कर्णधार होते. ते टीव्ही शोमुळेही खूप प्रसिद्ध झाले आहेत. परंतु, राजकारणात त्यांची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे गांगुली इथे टिकू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया टीएमसीने दिली आहे.

सौरव 'दादा' राजकारणात एन्ट्री करणार ? बंगालच्या राज्यपालांशी केली एक तास चर्चा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता- बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रविवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. राजभवनातील सूत्रांनी ही शिष्टाचार भेट होती. राजकारणाशी याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे, पुढीलवर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गांगुली राजकारणात प्रवेश करतील याबाबत अंदाज लावला जात आहे. 

सौरव गांगुली सायंकाळी सुमारे 4 वाजून 40 मिनिटांनी राजभवनात पोहोचले. परंतु, भेटीचे कारण त्यांनी सांगितले नाही. गांगुली आणि धनखड यांच्यादरम्यान ही भेट सायंकाळी 5.40 पर्यंत चालली. राजभवनातील सूत्रांनी ही भेट राजकीय विषयाशी संबंधित नसल्याचे सांगितले. 

हेही वाचा- POK मध्ये 250 दहशतवाद्यांचा वावर; सीमेवर तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव

दरम्यान, सौरव गांगुलीने राजकारणात उतरण्यास इच्छुक नसल्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचारही करणार नसल्याचे भाजपच्या आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचा दावा मागील महिन्यात माध्यमांत आलेल्या एका वृत्तात करण्यात आला होता. 'द टेलिग्राफ'च्या ऑनलाइन आवृत्तीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले होते. आपण सक्रिय राजकारण उतरणार नसल्याचे गांगुली यांनी भाजपसमोर स्पष्ट केले होते. आपण क्रिकेटमध्ये प्रशासकाच्या भूमिकेवर खूश असून पक्षानेही आपले मन बदलण्यासाठी कोणताही दबाव टाकू नये असेही ते म्हणाले होते. 

हेही वाचा- भाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ!

जर सौरव गांगुली राजकारणात आले तर ती अत्यंत दुखःद घटना असेल, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. टीएमसीचे खासदार सौगत राय यांना सौरव गांगुली यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी सौरव हे राजकारणात आले तर आपल्याला आनंद होणार नसल्याचे म्हटले. सौरव गांगुली हे बंगालींसाठी एक आयकॉन आहेत. कारण ते बंगालचे एकमेव कर्णधार होते. ते टीव्ही शोमुळेही खूप प्रसिद्ध झाले आहेत. परंतु, राजकारणात त्यांची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे गांगुली इथे टिकू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.