हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलींनी दिली प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सौरव गांधी म्हणाले की ते ठीक आहेत आणि लवकरच वापसी करतील. कोलकाताच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये 48 वर्षीय सौरव गांगुली यांच्यावर उपचार सुरु होते. 
 

आपण आपला जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो, हे खरं सिद्ध झालं. मी वूडलँड्स हॉस्पिटल आणि उत्कृष्ट देखभालीसाठी सर्व डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. मी पूर्णपणे ठीक आहे. आशा आहे की मी लवकरच पुनरागमन करेन, असं सौरव गांगुली यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हटलं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गांगुली यांना मोठा हृदयाचा झटका आला नव्हता. यामुळे त्यांच्या हृदयाला कोणतीही हानी झालेली नाही. भविष्यातील त्यांच्या आयुष्यावर याचा काहीही परिणाम पडणार नाही. ते सामान्य जीवन व्यथित करु शकतात.

ब्रेकिंग: कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने बजावले समन्स

शनिवारी जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुली यांच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. गांगुली यांच्यासोबत त्यांची पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशीष आहेत. आयपीएल 2020 स्पर्धेपासून सौरव गांगुली कामात व्यस्त होते. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी गांगुलींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI President Sourav Ganguly after being discharged from Kolkata Woodlands Hospital