सावधान! कोविड रुग्णांसाठी 5-10 दिवसांचा काळ महत्वाचा

या काळात त्रास वाढल्यास सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणं गरजेचं
Home Isolation
Home Isolation
Updated on

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second corona wave) लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणांमध्ये बराच बदल दिसून येत आहे. सध्या १४ दिवसांच्या आयसोलेशननंतर (14 days isolation period) रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंतच्या पाच दिवसांच्या कालावधीतच बिघाड झाल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. त्यामुळे हा काळ पॉझिटिव्ह रुग्णांसाठी खूपच महत्वाचा काळ आहे. या काळात रुग्णांना सौम्य लक्षणं असताना ते घरीच आयसोलेशनमध्ये असले किंवा रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्यांनी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. (Be careful The period from the fifth to the tenth day is important for covid patients)

Home Isolation
लसीकरणात आघाडी कायम; कोरोनामुक्तीत 'महाराष्ट्र' अव्वल!

ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आणि ते लक्षणं विरहित असले तरी अशा रुग्णांनी घरी आयसोलेशनमध्ये असतानाही संपूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. संसर्ग झाल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसांपर्यंत रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हाच काळ कोरोना विषाणूमुळे प्रकृती अधिक बिघडण्याचा कालावधी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, १४ दिवसांचा आयसोलेशनचा काळ संपल्यानंतरही रुग्णांना पोस्ट कोविडचा त्रास होऊ शकतो.

रुग्णासाठी पाचवा ते दहाव्या दिवसाचा कालावधी महत्वाचा का?

कोरोनाचा संसर्ग होण्यापासून त्यातून बरे होण्यापर्यंतचा कालावधी हा चौदा दिवसांचा असतो. या काळाचं तीन टप्प्यात वर्गिकरण करता येतं. यामध्ये दिवस १-४, दिवस ५-१० आणि दिवस १०-१४ या दिवसांचा समावेश होतो. पहिला दिवस हा प्रत्येक रुग्णांसाठी वेगवेगळा असू शकतो. त्यानंतर सहावा आणि सातवा दिवशी रुग्णाच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडिज तयार होतात. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत अनेक बदल दिसून येतात. बऱ्याचदा या काळात त्यांच्या शरिरातून जास्त प्रमाणात पाणी किंवा द्रव पदार्थ बाहेर टाकले जातात. हाच काळ अनेक रुग्णांसाठी कोरोनाविरोधात लढण्याचा मोठा काळ असतो. याच काळात अनेक रुग्णांची प्रकृती अचानक बिघडण्याची उदाहरणंही समोर आली आहेत.

६-१० दिवसांच्या आसपास लक्षणं वाढल्यास काय करावं?

संसर्गाची तीव्रता एखाद्या व्यक्तीच्या बरं होण्यामध्ये अडथळा आणू शकते. वेळेवर लक्षणं ओळखणं, ती शोधणं आणि त्यावर त्वरीत पुढील पावलं उचलणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आणि त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, सुरुवातीच्या काळात एखादी व्यक्ती घरामध्ये आयसोलेशनमध्ये असताना तीनं सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणं, सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणं (जरी रुग्णाला आधीपेक्षा बरं वाटत असलं तरीही) आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच काम करणं गरजेचं आहे. रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णाला ऑक्सिजन थेरपी, औषधं, संसर्ग कमी करण्यासाठी किंवा संसर्गातून कमी नुकसान होण्याबाबत सल्ला देऊ शकतात. तसेच जोपर्यंत डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आणि तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल तर पाठीवर झोपण्याऐवजी पालथं पडून रहा, असं करणं हे शरिरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते आणि त्यामुळे आपला श्वासोच्छवासातील अडथळा दूर होऊ शकतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com