
...अन् नवरी मंडपाऐवजी रुग्णालयात पोहोचली; लग्नात डीजे न लावल्याचा राग
लग्नात डीजे वाजवणे आता सामन्य झाले आहे. मात्र, लग्नात डीजे न वाजवणे नवरीसह कुटुंबाला चांगलेच महाग पडले. डीजे वाजवण्याची मागणी करीत गावातील काही दबंग लोकांनी वधूसह कुटुंबाला मारहाण (Beating the bride) केली. गुंडांच्या मारहाणीमुळे वधूचा हात फ्रॅक्चर झाला आणि वरात अर्ध्यावरून परतली. यामुळे तिला धक्का बसला आहे. ही घटना बिहारमधील सिरडाळा पोलिस स्टेशन हद्दीतील पचंबा बेलदरिया गावात घडली. गंभीर जखमी नवरीने मंडपाऐवजी हॉस्पिटल गाठले.
प्राप्त माहितीनुसार, माजी गावप्रमुखाच्या कुटुंबातील उमेश चौहान, रामबालक चौहान, कमलेश चौहान, कुलदीप चौहान व इतर लोक आमच्या घरी आले आणि लग्नात डीजे वाजवणे आवश्यक आहे, असे सांगू लागले. आम्ही त्यांना सांगितले की जमीन विकून मुलीचे लग्न करीत आहोत. आमच्याकडे डीजे लावण्याची सोय नाही. त्याचवेळी डीजेची ट्रॉली घेऊन घरी पोहोचले आणि पैसे मागू लागले, असे जखमी वधूचे काका गणेश चौहान यांनी सांगितले.
हेही वाचा: Gyanvapi masjid : मौर्यांच्या ट्विटला ओवैंसीचे उत्तर; म्हणाले...
यावरून वाद वाढत गेला. त्यानंतर गुंडांनी घरात घुसून बेदम मारहाण करून वधूसाठी ठेवलेले साहित्य तोडण्यास सुरुवात केली. नातेवाइकांनी त्यांना रोखले असता त्यांनाही मारहाण (Beating the bride) करण्यात आली. सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चार जणांना अटक केली.
राधे चौहान यांची मुलगी संगीता कुमारी हिचे लग्न नरेश चौहान यांचा मुलगा बसंत चौहानसोबत निश्चित झाले होते. वराकडचे गावात मिरवणूक घेऊन येत होते. वाटेत मुलाच्या वडिलांना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते घाबरून मिरवणूक घेऊन परतले. लग्न न झाल्यामुळे वधूला धक्का बसला. ती कोणाशी बोलत नाही आहे.
Web Title: Beating The Bride Anger At Not Having A Dj At The Wedding Crime News Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..