
Gyanvapi masjid : मौर्यांच्या ट्विटला ओवैंसीचे उत्तर; म्हणाले...
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सोमवारी (ता. १६) पूर्ण झाले. त्याचा अहवाल १७ मे पर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे. मात्र, यापूर्वी हिंदू पक्षाच्या वकिलाने दावा केला आहे की, मशिदीच्या आवारात बांधलेल्या विहिरीत शिवलिंग सापडले आहे. मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळला आहे. दुसरीकडे, वाराणसी प्रशासन न्यायालयाचा हवाला देऊन यावर बोलण्यास तयार नाही.
वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार, ज्ञानवापी मशीद (Gyanvapi masjid) संकुलाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाच्या वकिलांनी विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळला आणि म्हटले की, आत असे काहीही आढळले नाही.
हेही वाचा: एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह कुटुंबीयांना जाळले; स्वतः केली आत्महत्या
मात्र, या सर्वादरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) म्हणाले की, तुम्ही सत्य कितीही लपवले तरी एक दिवस ते समोर येतेच. दुसरीकडे, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, ज्ञानवापी एक मशीद होती आणि इन्शाअल्लाह कयामत होईपर्यंत राहील.
केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी ट्विट केले की, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानवापीमध्ये बाबा महादेवांच्या प्रकटीकरणाने देशाच्या सनातन हिंदू परंपरेला पौराणिक संदेश दिला आहे. तुम्ही सत्य कितीही लपवले तरी एक दिवस ते सर्वांसमोर येईलच कारण ‘सत्य हेच शिव आहे’. बाबा की जय, हर हर महादेव.
शेवटच्या दिवशीचा सर्व्हे संपल्यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले की, विहिरीत शिवलिंग सापडले आहे. ते त्याच्या संरक्षणासाठी दिवाणी न्यायालयात जाणार आहेत. हिंदू पक्षाचे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी दावा केला की, पाणी कमी होताच पाण्यासमोर एक मोठे शिवलिंग दिसू लागले. नंदीच्या मूर्तीच्या अगदी समोर सापडलेल्या शिवलिंगाचा व्यास १२ फूट ८ इंच असल्याचा त्यांचा दावा आहे. त्याची खोलीही पुरेशी आहे. दुसरीकडे हिंदू पक्षाचे सोहनलाल आर्य म्हणाले की, बाबा आज सापडले आहेत, कल्पनेपेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत.
मुस्लीम बाजूने दावा नाकारला
आत काहीही सापडले नाही. ज्याचा हिंदू पक्ष दावा करीत आहे, असे मुस्लिम पक्षाने सांगितले. त्याचवेळी दावा करण्याच्या दाव्यात न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत शिवलिंग प्रकरणावर मौन पाळले. दुसरीकडे, वाराणसीचे डीएम कौशल राज म्हणाले, आयोगाच्या कोणत्याही सदस्याने सर्वेक्षणाबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. हे प्रकरण न्यायालयात आहे.
Web Title: Keshav Prasad Maurya Asaduddin Owaisi Tweet Gyanvapi Masjid
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..