जनतेसाठी झटून काम केल्याने पुन्हा विजयी : पंतप्रधान

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 June 2019

गरिबांचे कल्याण हेच आमचे ध्येय

- निष्क्रिय सरकारपासून सक्रीय सरकार

नवी दिल्ली : सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये. लोकसभेत झालेला विजय हा देशातील जनतेचा विजय आहे. जनतेसाठी झटून काम केल्याने आम्ही पुन्हा विजयी झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे अविरत असे यश मिळाले, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. ते म्हणाले, पहिल्यांदा लोकसभेत आलेल्या खासदारांनी चांगले विचार मांडले. अनुभवी खासदारांनी आपला दृष्टीकोन मांडणे गरजेचे आहे. देशातील जनता ही लोकशाहीची मोठी शक्ती आहे. पाच वर्षांच्या कठोर परिश्रमामुळे आम्हाला मोठे यश मिळाले आहे. सरकारला मिळालेले यश हे जागरूक मतदारांचे आहे. पाच वर्षांतील कामगिरी पाहून, योजनांची यशस्वी अंमलबजवणी केल्याने आमचा विजय झाला. ज्यांचे कोणी नसतं त्यांचे सरकार असतं असा विश्वास आम्ही सर्वांना पटवून दिला. अनेक समोर आल्या तरीदेखील आम्ही जनतेचे सुखच पाहिले. हे करताना मोठ्या अडचणी आल्या होत्या. मात्र, त्या पार करत आता इथपर्यंत आलो आहोत. 

दरम्यान, देश पुढे जाण्यासाठी, गरिबांच्या विकासासाठी त्यांचे कल्याण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

गरिबांचे कल्याण हेच आमचे ध्येय

देशातील गरिबांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. महामार्ग, उड्डाण, स्टार्टअप, चांद्रयान यांमुळे आधुनिकतेकडे वाटचाल होत आहे. आता गरिबांचे कल्याण करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. 

निष्क्रिय सरकारपासून सक्रीय सरकार

यापूर्वी निष्क्रीय सरकार होते. त्यानंतर जनतेने आम्हाला संधी दिली. आताचा प्रवास निष्क्रिय सरकारपासून सक्रीय सरकार असा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of Development Work we are in Government says Narendra Modi