'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

रामगड (झारखंड) : 'बीफ' बाळगल्याच्या आरोपावरून रामगड जिल्ह्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आरके मलिक यांनी हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे.

रामगड (झारखंड) : 'बीफ' बाळगल्याच्या आरोपावरून रामगड जिल्ह्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आरके मलिक यांनी हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली देशभर होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणले, 'देशामधील कोणत्याही नागरिकास कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. लोकांचे जीव घेणे म्हणजे गोरक्षा नव्हे.' मात्र असा भावनिक आवाहनानंतर काही तासातच रामगडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अलिमुद्दिन ऊर्फ असगर अन्सारी हे आपल्या मारूती व्हॅनने प्रवास करत होते. दरम्यान बजारतंद येथे बंदी असलेले मांस बाळगल्याचा आरोप करत त्यांना जमावाने रोखले. मोटारीतून बाहेर काढून 30-40 जणांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांना जमावातून सोडवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बाबत माहिती देताना अतिरिक्त पोलिस महासंचालक आरके मलिक म्हणाले, 'असगरवर बालकांचे अपहरण आणि हत्येचा आरोप होता. बीफच्या व्यवसायामध्ये असलेल्या काही जणांनी मिळून त्यांना ठार करण्याचा कट रचला. हल्लेखोरांची ओळख पटली आहे.'

मागील तीन दिवसात झारखंडमध्ये अशा प्रकारच्या हत्येचा हा तिसरा प्रकार समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: beef crowd attack jharkhand marathi news indid news national news