World Honey Bee Day 2025 : सातून घडलेला मधुर मानवी प्रवास; जागतिक मधमाशी दिन विशेष
Ayurveda Benefits : मधमाशा आणि मानवाच्या सहजीवनाची हजारो वर्षांची प्राचीन परंपरा, ज्याने संस्कृती, आरोग्य आणि शेतीला नवी दिशा दिली. जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने या मौल्यवान नात्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
माणसाच्या संस्कृतीमध्ये मधमाशीला आदराचे, पूज्य स्थान लाभले आहे. भारतातील ग्रंथ, वेद, आदिवासी परंपरा, ग्रामीण जीवनशैली आणि वैदिक साहित्यामध्ये मधमाशी पालनाच्या परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त आहे.