Nitin Gadkari : देशातील कोणता पूल कोसळणार? दिल्लीत आधीच वाजणार अलार्म! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari : देशातील कोणता पूल कोसळणार? दिल्लीत आधीच वाजणार अलार्म!

Nitin Gadkari : गुजरातमधील मोरबीमध्ये नुकताच केबल पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशातील अनेक पुलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मोरबी येथील घटनेनंतर गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान करत त्यांच्या मेगाप्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

ते म्हणाले की, आता मी ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये जाऊन काही गोष्टींचा अभ्यास केला. त्याशिवाय नाशिकमधील आमच्या काही कर्मचाऱ्यांनी एक संशोधन केले आहे, यामध्य देशातील सर्व पूल एका अशा यंत्रणेने जोडले जाणार आहेत. यामुळे दिल्लीत ठेवलेल्या आमच्या कंप्यूटरवर देशातील कोणता पूल कोसळणार आहे याचे आधीच अलार्म मिळू शकणार आहे.

हेही वाचा: Sade Sati Effect On Marriage : साडेसातीचा लग्नावर काय परिणाम होतो?

80 हजार पुलांचा रेकॉर्ड पूर्ण

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की, 'देशातील 80 हजार पुलांचा रेकॉर्ड एकत्र केला आहे. याशिवाय 3 ते 4 लाख पुलांचा डेटा एकत्र करणे बाकी आहे. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या या सिस्टिममुळे कमकुवत किंवा कोसळणाऱ्या पूलाबाबत दिल्लीत ठेवलेल्या कंप्यूटरवर अलार्म वाजेल त्यानंतर याबाबत राज्य सरकार आणि कॉर्पोरेशनला पूल सदोष असल्याची माहिती दिली जाईल.

हेही वाचा: Foldable iPhone : आता Apple खिशात फोल्ड करून ठेवता येणार

गडकरी म्हणाले की, 2024 पूर्वी भारतील सर्व रस्ते अमेरिकेच्या बरोबरीने बनवू असे वचन आम्ही दिले असून, आमचा आमच्या कामावर विश्वास असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आणि देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही केवळ बोलत नाही तर, कामही दाखवत असल्याचे गडकरी म्हणाले.