RSS Mohan Bhagvat: इंग्रजांपूर्वी ७० टक्के भारतीय शिक्षित होते, पण नंतर...; मोहन भागवतांचा दावा

इंग्रजांच्या शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसच्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे.
Mohan Bhagvat
Mohan Bhagvate sakal

नवी दिल्ली : भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजी राजवटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीवर टीका करताना इंग्रजांपूर्वी भारतात ७० टक्के लोक शिक्षित होते, असं विधान त्यांनी केलं आहे. (Before the British 70 percent of Indians were educated RSS Mohan Bhagvat claim)

भागवत म्हणाले, "इंग्रज आपल्या देशावर राज्य करण्यापूर्वी शिक्षण व्यवस्थेत आपल्या देशाची ७० टक्के जनता साक्षर होती, शिक्षित होती. या शिक्षणाच्या जोरावर सर्व लोक आपापल्या उपजीविकेचा मार्ग शोधत होते. तेव्हा बेरोजगारी जवळपास नव्हतीच"

Mohan Bhagvat
BS Yediyurappa News : येडियुरप्पा हरवले प्लॅस्टिक पिशव्यांच्या वावटळीत! लँडिंगच्या शेवटच्या क्षणी पायलटनं बदलला निर्णय

दरम्यान, त्याचवेळी इंग्लंडमध्ये जी शिक्षम व्यवस्था अस्तित्वात होती. यामध्ये १७ टक्केच लोक साक्षर होते. पण भारतात दाखल झाल्यानंतर इंग्रजांनी आपली ही व्यवस्था मोडीत काढत जी ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती तिला टाकावू बनवलं. त्यांनी या लोकांना आपल्या देशात नेलं आणि त्यांची शिक्षण पद्धती आपल्याकडं रुजवली. त्यामुळं आपलं साक्षरतेचं प्रमाण १७ टक्के झालं आणि त्यांचे ७० टक्के लोक साक्षर झाले, असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com