योग शिक्षकांचे वेतन देण्यासाठी प्रसंगी भिकही मागू - अरविंद केजरीवाल

राजधानी दिल्लीतील आज आदमी पक्षाच्या सरकारने सर्वसामान्यांना योगशिक्षण देण्यासाठी चालवलेल्या विनामूल्य योगशाळांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न तूर्तास तरी फसला आहे.
 ARVIND KEJARIWAL
ARVIND KEJARIWALsakal
Summary

राजधानी दिल्लीतील आज आदमी पक्षाच्या सरकारने सर्वसामान्यांना योगशिक्षण देण्यासाठी चालवलेल्या विनामूल्य योगशाळांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न तूर्तास तरी फसला आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील आज आदमी पक्षाच्या सरकारने सर्वसामान्यांना योगशिक्षण देण्यासाठी चालवलेल्या विनामूल्य योगशाळांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न तूर्तास तरी फसला आहे.

केंद्रनियुक्त नायब राज्यपालांनी या योगशाळांना मान्यता न देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला न जुमानता दिल्ली सरकार आपल्या परीने लोकसहभागातून या योगशाळा पूर्ववत चालवतील असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री जाहीर केले.

विनामूल्य योगशाळा चालविण्याच्या या उपक्रमाला जीवदान मिळाल्याने दिल्लीतील 17 हजारांहून जास्त योगसाधकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने योग प्रशिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही म्हणजे दिल्ली सरकार जनतेकडून “अर्थदान” घेऊ किंवा किंवा प्रसंगी अगदी भीकही मागू, पण या योगशाळा यापुढेही यथास्थितीत चालू राहतील याची शाश्वती देऊ, असा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

मागील एका वर्षापासून दिल्लीत सुरू असलेल्या विनामूल्य योग प्रशिक्षण वर्गांवर मोदी सरकारची खप्पामर्जी झाली. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी याबाबतच्या फाईलवर निर्धारित मुदतीत स्वाक्षरी करण्याचे नाकारले.

त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून योगशाळा बंद होतील असे दिल्ली सरकारच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे हजारो योग साधकांमध्ये अस्वस्थता आणि तीव्र नाराजी होती. दिल्लीतील प्रस्तावित महापालिका निवडणुका आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षाचा झंझावात आणि केजरीवाल यांना मिळणारे समर्थन पाहून भाजपने हा दुष्ट निर्णय दिल्लीत घेतला, असा दिल्ली सरकारचा आरोप होता. उपमुख्यमंत्री मलिष सिसोदिया यांनी तसे बोलूनही दाखवले होते. दिल्लीत दररोज किमान 17 ते 25 हजार लोक या विनामूल्य योग शाळांमध्ये सहभागी होतात आणि योग करतात. नायब राज्यपालांच्या एका निर्णयामुळे या योग्यशाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीकरांनी केजरीवाल सरकारला या योगशाळा पूर्ववत सुरू ठेवाव्यात यासाठी आग्रही विनंती केली. हजारो योग साधकांनी याबाबतची आवाहने करणारे मेल आणि व्हाट्सअप मेसेज दिल्ली सरकारकडे पाठवले. त्यानंतर केजरीवाल यांनी योगशाळा पूर्ववत करण्याचा निर्णय आज घेतला.

केजरीवाल यांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की - माझ्या मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की माझ्या कळकळीच्या आवाहनानंतर, योगशाळा सुरू ठेवण्यासाठी दिल्लीतील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.

त्यानुसार "दिल्लीच्या योगशाळा" चे वर्ग पूर्ववत सुरु होत आहेत. दिल्लीच्या योगशाळेच्या फाईलला अजूनही माननीय “एलजी” सरांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे आमचे योगवर्ग बंद झाले. मात्र दिल्ली सरकारने ठरविले आहे की दिल्लीतील योगशाळेत उद्या सकाळ पासून योगाचे वर्ग सुरू होतील. आमच्या व्रतस्थ योग प्रशिक्षकांच्या पगाराची काळजी करू नका. जनतेच्या सहभागाने किंवा महिनाभर भीक मागूनही योग प्रशिक्षकांचा पगार आम्ही वेळेवर शकतो, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com