

Belagavi Damone Family Fire
esakal
बेळगाव : चव्हाट गल्लीतील (ढोर गल्ली) दमोने कुटुंबातील सहा जणांचा बळी गेलेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला शॉर्टसर्किट आणि त्यानंतर फ्रीजमध्ये झालेल्या बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आग लागण्याच्या काही मिनिटे आधी घराजवळ हातात बादली घेऊन आलेली एक संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. यामुळे पोलिसांनी घटनेची नव्याने चौकशी सुरू केली आहे.