Belagavi Khanapur NH748 latest toll charges
esakal
खानापूर : बेळगाव–खानापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील गणेबैल टोलनाक्यावर शनिवारपासून वाहनांसाठी सुधारित टोल दर लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या ठेकेदारामार्फत वाढीव दरांची अंमलबजावणी केली असून हे दर ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत. चौपदरीकरण अद्याप अपूर्ण असतानाच गणेबैल येथे टोलनाका सुरू करण्यात आला (Belagavi–Khanapur NH 748 Toll Charges 2026) होता. सुरुवातीला खासगी कंपनीकडे टोल वसुलीचा ठेका होता.