Woman Loses Jewellery Worth ₹18.30 Lakh During KSRTC Bus Travel
Sakal
बेळगाव : केएसआरटीसी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे १८ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. दीपाली भारत पाटील (वय ४४, रा. इंदिरानगर नगर, कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी पाटील यांचे माहेर बेळगाव तालुक्यातील शिंदोळी. त्या २० नोव्हेंबर रोजी आईच्या प्रकृतीची विचारपूस आणि नातेवाईकांच्या लग्नासाठी शिंदोळीला जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. दुपारी दोन वाजता कापोली येथून बसने निघाल्या.