संतापजनक! पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत, असं काय घडलं?

कुडची पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Crime
Belgaum Crimeesakal
Summary

बसप्पा रंगप्पा बळनुकी असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. बसप्पा केएसआयएसएफमध्ये पोलिस आहे.

रायबाग (जि. बेळगाव) : पत्नीने गावाकडे उद्या जाऊया, असे म्हटल्यावर एकाने रागाच्या भरात स्वतःच्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटले. त्यात त्या कोवळ्या जिवाचा मृत्यू झाला. हा प्रकार चिंचली (ता. रायबाग) येथे सोमवारी (ता. १८) घडला.

संचित बसप्पा बळनुकी (वय ४ महिने) असे बालकाचे नाव आहे. बसप्पा रंगप्पा बळनुकी असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. बसप्पा केएसआयएसएफमध्ये पोलिस आहे. कुडची पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Belgaum Crime
Ganeshotsav 2023 : गणपतीच्या स्वागतावेळी फरशीवरून पाय घसरल्याने भक्ताचा दुर्दैवी अंत; डोक्याला गंभीर दुखापत

याबाबत कुडची पोलिसांनी (Kudachi Police) दिलेली माहिती अशी : बसप्पा अथणी तालुक्यातील दुरडुंडी येथील रहिवासी आहे. त्याचा १९ महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्याच्या पत्नीचे माहेर चिंचली आहे. ती तेथे असल्याने बसप्पा पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला सायंकाळी गेला होता. यावेळी पत्नीने आज सण आहे, उद्या जाऊया, असे म्हटल्यावर बसप्पाला राग अनावर झाला. त्याने पत्नीला आजच जायचे, असे बजावले.

Belgaum Crime
Maratha Reservation : घटनादुरुस्तीशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे तितकंच खरं; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

तरी पत्नीने न ऐकल्याने त्याने घरासमोर जाऊन आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर जोराने आदळले. त्यात बाळाला जोराचा मार बसून ते जागीच ठार झाले. हा प्रकार पाहून परिसरातील लोक धावत आले. त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

Belgaum Crime
Women's Reservation Bill : नव्या विधेयकात भाजपनं अशी पाचर मारून ठेवली की..; वर्षा गायकवाडांचा मोदी सरकारवर निशाणा

बसप्पा केएसआयएसएफमध्ये बेळगाव-सांबरा येथे राखीव पोलिस आहे. कुडची पोलिस ठाण्यात सोमवारी या प्रकाराची नोंद झाली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत बळनुकी याला आज अटक केली. त्याची गोकाक उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com