बेळगाव शहरात पावसाचा जोर पुन्हा वाढला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 August 2019

बेळगाव - शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अंबा भुवनकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच फूट पाणी आले आहे. तर अंबा भुवनकडून पाटील मळ्यात मोठया प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे या भागातील 14 घरे पडली आहेत.

या परिसरातील नागरिकांनी माती टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे अंबा भुवन येथील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. तसेच मराठा कॉलनी आणि इतर भागात पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे सलग पाच दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली आहेत. मात्र शाळा आणि महाविद्यालयाच्या इमारतीत अधिक प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum city received heavy rainfall again