बेळगाव महापालिकेत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर 'वाॅक आऊट' मात्रा

बेळगाव महापालिकेत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर  'वाॅक आऊट' मात्रा

बेळगाव - प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे बेळगाव महापालिकेत लेखा स्थायी समितीच्या बैठकीतून अध्यक्षा वैशाली हुलजी व सदस्यांनी 'वाॅक आऊट' केले. त्यांनी थेट आयुक्तांचा कक्ष गाठला व अधिकारी आल्याशिवाय बैठक सुरू होणार नाही अशी भूमिका घेतली.

बैठकीला सर्वच अधिकारी हवेत का? असा बालबोध प्रश्न विचारत आयुक्तांनी काहीजण रजेवर गेल्याचे सांगितले. पण वाॅक आऊटची ही मात्रा चांगलीच लागू पडली. आयुक्तानी सर्व अधिकार्यांशी संपर्क साधून तातडीने बैठकीला हजर राहण्याची सूचना दिली. पंधरा मिनिटे अधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली जाईल. अधिकारी न आल्यास बैठकीवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा अध्यक्षा हुलजी व सदस्यांनी दिला.

दरम्यानच्या काळात महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी व उपमहापौर मधुश्री पुजारी बैठकीच्या ठिकाणी गेले. अध्यक्ष व सदस्यच उपस्थित नसल्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटले. पण अधिकारी तातडीने सभागृहात आल्यामुळे बैठक सुरू करण्यात आली. अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे याआधीची लेखा स्थायी समिती बैठक तहकूब करण्यात आली. सोमवारीही अध्यक्षा व सदस्य सभागृहात अधिकाऱ्यांची प्रतिक्षा करत बसले होते.

लेखाधिकारी मुकुंद दिक्षित, कायदा सल्लागार अॅड. यू. डी. महांतशेट्टी व कौन्सिल विभागाच्या महिला कर्मचारी वगळता बैठकीत कोणीच उपस्थित नव्हते.  हुलजी यांनी बैठक केल्यावर सदस्य संजय सवाशेरी यानी आक्षेप घेतला. अधिकारी नसताना बैठक कशी घ्यावयाची असा सवाल त्यानी केला. दिनेश रवाळ, मिनाक्षी चिगरे, राकेश पलंगे, सतीश देवर पाटील व शांता उप्पार यांनीही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा विषय मांडला. बैठकीतून वाॅक आऊट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व सर्वजण आयुक्तांच्या भेटीसाठी गेले. या निर्णयामुळे मुख्य लेखाधिकारी रामाप्पा हट्टी, प्रशासन उपायुक्त डाॅ शशीधर नाडगौडा, महसूल उपायुक्त ए. एस. कांबळे बैठकीला उपस्थित राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com