मुंचडीजवळ रेल्वेच्या धडकेत 9 गायी ठार; 3 जखमी 

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 22 मे 2018

बेळगाव - भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने ठोकरल्यामुळे नऊ गायींचा मृत्यू तर अन्य तीन गायी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 22) पहाटे बेळगावजवळील मुचंडी गावानजीक घडली. या घटनेमुळे शेतकरीवर्गातून हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 

बेळगाव - भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने ठोकरल्यामुळे नऊ गायींचा मृत्यू तर अन्य तीन गायी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 22) पहाटे बेळगावजवळील मुचंडी गावानजीक घडली. या घटनेमुळे शेतकरीवर्गातून हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 

बेळगाव तालुक्‍यामधील हुल्यानूर व बुड्य्रानूर या डोंगराळ भागातील शेतकरी आपली जनावरे रेल्वे रुळ व आजुबाजूच्या परिसरात चरण्यासाठी सोडतात. सोमवारी (ता. 21) दिवसभर फिरुन रात्रीच्यावेळी गायी विश्रांतीसाठी मुचंडी गावाजवळील रेल्वे रुळावर बसल्या होत्या. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास येथून जाणाऱ्या रेल्वे चालकाला रुळावर गायी बसल्याच्या अंदाज आला नाही. त्यामुळे भरघाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून 9 गायी जागीच ठार झाल्या; तर तीन गायी गंभीर जखमी झाल्या आहेत.

सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी हा अपघात पाहून नजिकच्या गावातील लोकांना गायी ठार झाल्याची माहिती दिली. हुल्यानूर व बुड्य्रानूर गावातील लोक रात्रीच्या वेळीही जनावरे घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे कलखांब, खणगाव, अष्टे परिसरातील शेतकऱ्यांच्या शिवारात गायी चरतात. या मोकाट जनावरांचा त्रास शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात रेल्वे रुळावर रात्रीच्या वेळी बसणाऱ्या काही गायींसह जनावरे अपघातात जखमी झाल्याची माहिती परिसरातील लोकांनी दिली. 

Web Title: Belgaum News 9 cow dead in rail accident