‘एअर इंडिया’कडून बंगळूर-बेळगाव विमानसेवा २५ पासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

बेळगाव - सांबरा विमानतळावरून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. येत्या २५ जूनपासून एअर इंडियाची बंगळूर-बेळगाव विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल. त्यानंतर बेळगाव-मुंबई सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी मंगळवारी (ता. १९) विकास आढावा बैठकीत दिली. 

ते म्हणाले, ‘स्पाइसजेट कंपनीने १ मार्चपासून सांबरा विमानतळावरून सुरू असलेली विमानसेवा बंद करून हुबळीतून सुरू केली. परिणामी बेळगाव व परिसरातील प्रवाशांची मोठी अडचण झाली. याबाबत केंद्रीय विमान उड्डाण मंत्र्यांशी चर्चा केली. सांबरा विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावर मंत्र्यांनी बेळगावची विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते.

Web Title: Belgaum News bangalore Belgaum air service