अस्वलाच्या कळपाची चाल; घोंगड्याची बनवली ढाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

खानापूर - कौंदल शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेवाडी (ता. खानापूर) शिवारात गुरुवारी (ता. २८) शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला झाला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखवून सहीसलामत सुटका करुन घेतली. नारायण गावडू पाटील असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्‍यात अस्वलाचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नारायण पाटील नेहमीप्रमाणे जनावरे चारावयास रानात गेले होते. झाडाखाली विश्रांती घेत असताना अचानक अस्वल आणि तीन पिलांचा कळप त्यांच्यावर चाल करुन आला. संभाव्य धोका ओळखून नारायण आपल्याकडील घोंगडे तिथेच टाकून झाडावर जाऊन बसले. तेवढ्यात तिथे आलेल्या अस्वलांनी माणूस समजून घोंगड्यावर हल्ला चढवला. काही वेळानंतर त्यांनी तेथून जाणे पसंद केले. अस्वले गेल्यावर नारायण खाली उतरले. पण, काही क्षणातच कळप पुन्हा दाखल झाला. नारायण पुन्हा झाडावर चढले.

चरणारी जनावरे अस्वलांच्या दिशेने चाल करुन आली. त्यांनी अस्वलांवरच हल्ला चढविला. अस्वलांनी पळ काढला. पुढच्या शिवारात सदानंद पाटील हे कोळपणी अवजार डोक्‍यावर घेऊन चालले होते. कळप येत असल्याचे पाहून त्यांनी अवजार तिथेच टाकून पळ काढला. अस्वले जंगलात गेल्याची खात्री पटल्यानंतर नारायण जनावरांना घेऊन माघारी परतले. 

अस्वलांचा वावर वाढला
या भागात अस्वलाचा वावर वाढला असून शेतकरी शेतात जाण्यासही कचरत आहेत. कौंदलमधील दुर्घटनेनंतर तर शेतकऱ्यांनी अस्वलांची धास्तीच घेतली आहे. पण, वनखात्याने काहीच हालचाली न केल्याने नाराजी आहे. वारंवार हल्ले होत असल्याने वनखात्याने अस्वलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: Belgaum News Beer Herd in khanapur Taluka

टॅग्स