मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

बंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सिद्धरामय्या आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढविणार हे नक्की झाले आहे.

बंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सिद्धरामय्या आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढविणार हे नक्की झाले आहे.

दरम्यान सिद्धरामय्या यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने बदामी मतदारसंघातून माजी मंत्री श्रीरामलू यांना रिंगणात उतरले आहे. श्रीरामलू हे मूळचे बळ्ळारी येथील असले तरी भाजपने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे केले आहे. त्यामुळे बदामीमधील निवडणूक रंगतदार होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूर जिल्ह्यातील वरूण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. याच मतदारसंघातून ते प्रत्येक वेळी विधानसभेवर निवडून गेले आहेत. पण धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे आव्हान स्विकारून यंदा चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांनी घेतला.

वरूण मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव डॉ. यतींद्र हे निवडणूक लढविणार आहेत. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणूकीला सामोरा जात आहे. पक्षाची सत्ता आलीच तर पुन्हा सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री होणार हे नक्की आहे. त्यामुळे सिद्धरामय्या हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू होती.

सिद्धरामय्या यानीही त्यासंदर्भात सूतोवाच केले होते. पण दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात कॉंग्रेस पक्षातीलच काहींचा विरोध होता. 20 एप्रिल रोजी सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवशी त्यानी बदामी येथून अर्ज दाखल केला. सिद्धरामय्या यांच्या विरोधात श्रीरामलू उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी चर्चा होती, ती चर्चा खरी ठरली. श्रीरामलू यानीही मंगळवारी बदामी येथून अर्ज दाखल केला. 

Web Title: Belgaum News Chief Minister siddaramaiah fill form from Badami