चिक्कोडी नगरपालिकेचे निवडणूक आरक्षण जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

चिक्कोडी - नगरविकास खात्याच्यावतीने तालुक्‍यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतींचे आरक्षण 25 मे रोजी जाहीर केले आहे. सात दिवसाच्या आत आक्षेप नोंदविण्याची मुदत होती. पण प्रत्यक्षात ही मुदत संपल्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात आल्याने यासाठी आक्षेप नोंदविण्यापासून नागरिकांना वंचित रहावे लागले. 

चिक्कोडी - नगरविकास खात्याच्यावतीने तालुक्‍यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर केले आहे. चिक्कोडी शहरातील 23 वार्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यात 10 जागा महिलांसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी ए साठी 4 जागा असून त्यातील दोन जागा महिलांसाठी आरक्षीत आहेत. सामान्य वर्गासाठी 5, सामान्य महिला वर्गासाठी 5, एससीसाठी 3, एससी महिलांसाठी 2, एसटीसाठी 1, ओबीसी ए महिलांसाठी 2, ओबीसी बी साठी 1 अशा जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. वार्ड रचना पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे.

वार्डनिहाय आरक्षण असे
*वार्ड क्रमांक*आरक्षण
*1*सामान्य
*2*ओबीसी महिला
*3*सामान्य महिला
*4*ओबीसी ए
*5*सामान्य महिला
*6*ओबीसी बी
*7*सामान्य
*8*ओबीसी ए महिला
*9*एससी
*10*सामान्य
*11*एसटी
*12*ओबीसी ए
*13*सामान्य महिला
*14*सामान्य
*15*एससी
*16*एससी महिला
*17*एससी
*18*एससी महिला
*19*सामान्य
*20*सामान्य महिला
*21*सामान्य
*22*सामान्य महिला
*23*सामान्य महिला

एक नजर...
*ओबीसी ए साठी 4
*सामान्य वर्गासाठी 5
*सामान्य महिला वर्गासाठी 5
*एससीसाठी 3
*एससी महिलांसाठी 2
*एसटीसाठी 1
*ओबीसी ए महिलांसाठी 2
*ओबीसी बी साठी 1
 

Web Title: Belgaum News Chikodi Nagarpalika Election Reservation declared