कोगनोळी टोल नाक्‍यावर प्रचाराचे साहित्य जप्‍त

अनिल पाटील
रविवार, 15 एप्रिल 2018

कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर लक्‍झरी बसवर पोलिसांनी कारवाई करून भारतीय जनता पक्ष व एम ई पी पक्षाच्या प्रचाराचे चिन्‍ह असलेले टाॅवेल व टोप्याच्‍या 22 बॅग जप्त केल्या.

कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर लक्‍झरी बसवर पोलिसांनी कारवाई करून भारतीय जनता पक्ष व एम ई पी पक्षाच्या प्रचाराचे चिन्‍ह असलेले टाॅवेल व टोप्याच्‍या 22 बॅग जप्त केल्या.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंबईकडून बंगळूरकडे जाणारी लक्सरी बस (एमएच 04, एचवाय 8090) येथील टोलनाक्यावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चेकनाक्यावर तपासणी केली. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एमईपी पक्षाच्या प्रचाराचे साहित्य असल्याचे दिसून आले. त्यासंबंधीची कागदपत्रे तपासणी केली असता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस निरिक्षक निगनगौडा पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

यावेळी मंडल पोलिस निरीक्षक एम. पी. सवरगोळ, एम. आर. हंची, दीपक हरदी, पी.जी. सावळोजी, एम. डी. हिरेमठ, एन. एस. सगरेकर यांच्‍यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Web Title: Belgaum News election Confidential material seized at Kognoli Toll Naka