भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा घरासमोर तयार केले फास

मल्लिकार्जुन मुगळी 
बुधवार, 7 मार्च 2018

बेळगाव - बुडाच्या निवासी योजनेसाठी कणबर्गी येथील भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भूसंपादन केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरात फास तयार करून ठेवले आहेत. गळफास घेवून आत्महत्या करण्याचा इशारा त्यानी दिला आहे.

भूसंपादनाच्या विरोधात 9 मार्च रोजी कणबर्गी येथे आंदोलनही करण्यात येणार आहे. आमदार फिरोज सेठ बुडा चेअरमन झाल्यावर कणबर्गी निवासी योजनेच्या कार्यवाहीला वेग आला आहे. पण शेतकर्यानी भूसंपादनाला जोरदार विरोध केला. भूसंपादनाच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही बुडाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्यामुळेच शेतकर्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Web Title: Belgaum News farmers suicide alert against land acquisition