हैद्राबादचा तरुण चोर्ल्यातील अपघातात ठार 

महेश काशीद
बुधवार, 30 मे 2018

बेळगाव - चोर्ल्याजवळ अपघातात हैद्राबादचा तरुण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. 29) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. पी. जी. हर्षा (वय 21, रा. हैद्राबाद) असे त्याचे नाव आहे. मयत हर्षासह चौघे मित्र गोवा फिरण्यासाठी आले होते. गोव्याहून बेळगावला येताना वाटेत अपघात झाला. 

हैद्राबाद येथील महाविद्यालय विद्यार्थी मंगळवारी (ता.29) गोव्याला फिरण्यासाठी आले होते. दिवसभर गोव्यामधील पर्यटन ठिकाणांना भेट दिली. रात्री उशिरा गोव्याहून बेळगावला येण्यासाठी तरुण निघाले. चोर्ल्याजवळ वाहन पोचल्यानंतर वळणावरून चालकाला येथील खड्ड्याचा अंदाज आला नाही. वाहन खड्ड्यात जाऊन पलटी झाले. त्यात हर्षाला गंभीर दुखापत झाली. मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेच्या माहितीनंनंतर खानापूर पोलिस दाखल झाले. जखमी चौघांना रुग्णवाहिकेतून केएलई रुग्णालयामध्ये दाखल केले. हर्षाच्या मृत्यूची माहिती कुटूंबियांना दिली. खानापूर पोलिसात याची नोंद आहे.

Web Title: Belgaum News Hyderabad youngster dead in accident in Chorla