कर्नाटकात दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आगीतून फुफाट्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

बेळगाव - शिक्षण खात्याने दहावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीच्याच वर्गात प्रवेश द्यावा, अशा सूचना केल्या आहेत. परंतु, गत शैक्षणिक वर्षापासून नववीत गणित व विज्ञान विषयांसाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. गतवर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम नव्हता. त्यामुळे, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होणार आहे. 

दरवर्षी शिक्षण खात्याकडून पाठयपुस्तकांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात येत आहे. गेल्यावर्षी नववीच्या दोन विषयांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके दिली होती. यंदा त्यांना दहावीतही एनसीईआरटीची पुस्तके असणार आहेत. एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा लाभ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे, गेल्यावर्षीपासून हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. 

यंदा राज्यात दहावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतही ते अनुत्तीर्ण झाले तर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडू नये यासाठी अनुत्तीर्णांना पुन्हा दहावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटी अभ्यासक्रम नव्हता. त्यामुळे, यंदा गणित व विज्ञान शिकताना अवघड जाणार आहे. शिक्षण खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीत प्रवेश घ्या, असा संदेश शिक्षण खात्याने पाठविला आहे. मात्र, गेल्यावर्षी एनसीईआरटी अभ्यासक्रम दोन विषयांसाठी लागू केला होता. यंदा दहावीतही तोच अभ्यासक्रम असेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे विषय समजून घेणे अवघड बनणार आहे. नवीन अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांना अधिक वेळ प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
- नंदिनी मुतालिक-देसाई, 

प्राचार्या, केएलएस शाळा

Web Title: Belgaum News issue of SSLC fail student